फक्त कादंबऱ्याच नव्हे तर लेखक, जेम्स बॉंडचे चित्रपट, इतिहास, जेम्स बॉंड म्हणून प्रसिद्ध झालेले अभिनेते, सेटवर घडलेल्या अफलातून घटना, जेम्स बॉंडच्या तोंडी असलेली विनोदी वाक्य, वेगवेगळी शस्त्रं, अफलातून मोटारी आणि बरंच काही. हे फक्त एक पुस्तक नाही तर 'जेम्स बॉंड' उर्फ ००७ वर लिहिलेला एक विश्वकोशच आहे.