जगात अनेक लोक आहेत ज्यांमध्ये अनेक कला असतात. पण त्याहूनही खुप क्वचितच लोक अष्टपैलू देखिल असतात. तसाच बेनितो देखिल होता. एक निरागस , कष्टाळू मुलगा. शाळेत दुसऱ्याकडून अपमानित होणारा, रस्त्यावर मार खाणारा आणि घरीपण पालकांसाठी डोकेदुखी असणारा हा मुलगा सामाजिक त्रासाला किंवा मानसिक त्रासाला कंटाळून वेडा होऊन जातो. पण त्यामध्ये ती कला असते ती कुवत असते की त्यामुळे तो आंतरीक शक्ती वाढवून इलूमिनिस्ट होऊन जातो.
स्पॅनिश मधील माझ्या या कथेला मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि मराठी लोकांच्या मागणीमुळे मी हि कथा मराठी मधून प्रकाशित करणार आहे.