या सर्व गोष्टी या पुस्तिकेमध्ये रामकृष्ण संघाचे बारावे अध्यक्ष श्रीमत् स्वामी भूतेशानंदजी महाराज यांनी अतिशय सोप्या पद्धतीने समजावून दिलेल्या आहेत. ते थोर विचारवंत, प्रसन्न संभाषण करणारे व सभोवतालच्या लोकांवर तळमळीने प्रेम करणारे होते. या सगळ्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ते एक महान आध्यात्मिक व्यक्तित्व होते. जे कोणी त्यांच्या सहवासात येत त्या सर्व लोकांचे भौतिक आणि आध्यात्मिक कल्याण होण्यात त्यांना खरा आनंद वाटे. प्रथम रामकृष्ण संघाचे उपाध्यक्ष म्हणून आणि नंतर अध्यक्ष म्हणून हजारो भक्तांना मंत्रदीक्षा देण्याचा अधिकार त्यांना लाभलेला होता आणि त्यात त्यांना आनंदही वाटत असे. अशा वेळी ते केवळ ध्यानधारणेतील प्रत्येक पायरी तपशिलाने स्पष्ट करून थांबत नसत तर आध्यात्मिक जीवनातील बारकावेही स्पष्ट करीत. दीक्षार्थींसमोर त्यांनी केलेली प्रवचने केवळ माहितीपर नसत तर प्रेरणादायकही असत.
ही पुस्तिका म्हणजे अशाच तीन प्रवचन-लेखांतील सुयोग्य मजकुराचे एकत्रीकरण आहे –
प्रस्तुत पुस्तिकेमध्ये वाचनसुलभतेसाठी उपशीर्षके दिलेली आहेत.
प्रस्तुत पुस्तिकेच्या वाचनाने आध्यात्मिक जीवनाची ओढ असणाऱ्या व मंत्रदीक्षा प्राप्त करू इच्छिणाऱ्या वाचकांना अभ्युदय आणि निःश्रेयस प्राप्त होण्यास मदत