’पोस्टमास्तर आणि इतर कथा’ हा रवीन्द्रनाथ ठाकूरांच्या अपूर्व प्रतिभेतून साकारलेला कथासंग्रह. यातील कथा या प्रामुख्याने ’स्त्री’ केंद्रित आहेत. बालविवाहिता, घरासाठी, स्नेहासाठी आसुसलेली अनाथ पोर, पतिपरायण स्त्री, दु:खी विधवा, विधवा प्रेयसी, सौंदर्यवती गुलाम स्त्री, बाणेदार तेजस्वी पत्नी अशा निरनिराळ्या स्त्री व्यक्तिमत्त्वांचे प्रभावी चित्रण या कथांमध्ये आले आहे. या कथांमधून स्त्रीच्या अंतरंगाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न रवीन्द्रनाथांनी केला आहे. स्त्री ज्या आदराला आणि प्रतिष्ठेला पात्र आहे तो आदर आणि प्रतिष्ठा रवीन्द्रनाथ आपल्या प्रत्येक कथेत स्त्रीला देतात. अत्यंत मनोज्ञ पद्धतीने लिहिलेल्या या कथा वाचकांना नक्कीच आवडतील यात शंका नाही.