विज्ञानामागील सायन्स: Vidnyanamagil Science

· Aarth Marathi
4.7
18 reviews
Ebook
130
Pages

About this ebook

संपूर्ण पुस्तक हे प्रश्नोत्तर स्वरूपाचे आहे. ज्यात आपले मन आपल्याला विचारते, यामागे काहीतरी आहे, पण मग नक्की ते आहे तरी काय? इथे प्रश्नांची निवड मोजक्याच शब्दांत केली आहे, जेणेकरून प्रश्न रटाळ वाटणार नाहीत, आणि अंधश्रद्धेवरील प्रश्नाचे निराकरण अनेक समाजसुधारकांनी आणि साहित्यिकांनी केले आहेच, तर मग या पुस्तकात वेगळे काय वाचायला मिळेल?

तर या पुस्तकात जपानमधील १० हजार वर्षापुर्वी समुद्रात बुडलेले योगागूनीच्या विशाल शहराबद्दल, न्युझीलँड येथील वेटोमो गुहेच्या चमकण्याचे रहस्य, कोलंबिया येथील कैनो क्रिस्टल्स या रंग बदलणाऱ्या नदीचे रहस्य, चंद्र आणि सूर्याभोवती रिंगण का पडते? आजूबाजूला वाळवंट असून देखील नाईल नदी आटली कशी नाही? ज्वालामुखी त्सुनामी म्हणजे काय? तुर्की येथील हजारो वर्षांपासूनचे गरम पाण्याचे झरे, समुद्राच्या लाटा नेहमीच किनाऱ्याकडे का येतात? वेगवेगळ्या ग्रहांवर वस्तूंचे वजन भिन्न का असते? घड्याळात क्वार्ट्झ (Quartz) का लिहिलेले असते? मनुष्य प्राणी अंतराळात जास्तीत जास्त किती दिवस राहू शकतो? सॅटेलाईटच्या प्रक्षेपणाच्या वेळी त्याच्याभोवती सोनेरी कागद का लावतात? सूर्याची उत्पत्ती कशी झाली? अशा प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. काही प्रश्न रहस्यांमागील विज्ञान (सायन्स) सांगतात, तर काही उत्तरे आपले ज्ञान वाढवतात. पुस्तकामध्ये मी मराठी क्वोरावर लिहिल्येला उत्तरांचा देखील समावेश केला आहे, ज्यांपैकी अनेक उत्तरांची सर्वोत्कृष्ट उत्तरे म्हणून निवड झाली आहे.

मराठी क्वोरा, अर्थ मराठी ज्ञानभांडारच्या माध्यमातून वाचकांसाठी याआधी देखील (वि)ज्ञान वाढवणारी माहिती उपलब्ध करून दिली आहे, आणि ते ज्ञान पुस्तकस्वरूपी प्रकाशित करताना वाचकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. आणि हो, विज्ञानामागील सायन्स जेव्हा वाचकाला आवडेल, तेव्हाच तर तो सायन्स-फिक्शन आवडीने वाचेल.

Ratings and reviews

4.7
18 reviews
Nimish Sonar
May 1, 2021
उत्तम मांडणी, दर्जेदार प्रश्नोत्तरे!
Did you find this helpful?
Abhishek Thamke
May 2, 2021
प्रत्येक विज्ञान प्रेमींसाठी...!!
Did you find this helpful?
Premanand Walkar
August 24, 2022
excelaatishay सुंदर आणि विवीधापणा आहे
Did you find this helpful?

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.